Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

अकोला जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
loni village Livestock farmers in distress due to lack of water and fodder

loni village Livestock farmers in distress due to lack of water and fodder

sakal

Updated on: 

अकोला - जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाण्याअभावी शेती संकटात सापडली असतानाच आता दुग्ध व्यवसायावरही संकटाचे सावट निर्माण झाले आहे. जनावरांचे संगोपन करायचे कसे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला असून, काहींवर जनावरे विकण्याची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com