
अकोला : विदर्भात पावसाने पुनःश्च सक्रियता दाखवत नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भासाठी ८ जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.