
अकोला : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सततधार पाऊस पडत असून, अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्हाभरात बसला आहे. दि.१७ व १८ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, २६ पशुधन दगावले आहे. पावसाच्या पाण्यामुळे ३८९ घरांचे नुकसान झाले असून, ३५६ गावातील ५९ हजार २८९ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.