Maharashtra Floods: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार; शेतकऱ्याचा पुरात वाहून मृत्यू; हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
Akola News: जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन, हळद, तूर, मूग यासारखी खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. रिसोड तालुक्यातील वाडी रायताळ येथील शेतकरी पिराजी गवळी पुरात वाहून गेले असून त्यांचा मृत्यू झाला आहे.
रिसोड : जिल्ह्यात स्वातंत्रदिनी व शनिवारी (ता.१६) मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने जिल्ह्यातील नदीकाठच्या जमिनीवरील पिके खरडून गेली आहेत. रिसोड तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.