esakal | पावसाचा जोर ओसरला, धग कायम!, पिके गेली पाण्याखाली; प्रकल्पांमधील जलसाठा वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rains recede in Akola district, clouds remain !, crops submerged; Increased water storage in projects

गेल्या आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मंडळातील पिके पाण्याखाली गेली आहे. मंगळवारी पाण्याचा जोर ओसरला.

पावसाचा जोर ओसरला, धग कायम!, पिके गेली पाण्याखाली; प्रकल्पांमधील जलसाठा वाढला

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला  ः गेल्या आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मंडळातील पिके पाण्याखाली गेली आहे. मंगळवारी पाण्याचा जोर ओसरला.

दिवसभर पाऊस नसताल तरी आठवडाभर झालेल्या पावसाची धग मात्र कायम आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रकल्पांमधील जलसाठा वाढल्याने नदीमध्ये सुरू असलेल्या विसर्गाने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

गेल्या २४ तासात वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. अकोल्यात पळसोबढे, कुरणखेड, बार्शीटाकळी तालुक्यात महान, राजंदा, धाबा, पिंजर, हादगाव या मंडळात जोरदार पावसाने हजेरी दिली. जिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा प्रकल्प वेगाने भरले. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील नदी-नाल्यांचे पाणी अकोला जिल्ह्‍यातील प्रकल्पांमध्ये येत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

--गेल्या २४ तासातील प्रमुख मंडळातील पाऊस
अकोला जिल्हा ः पळसो ४९, कुरणखेड ८४, कापशी २९, महान २७, राजंदा २५, धाबा १८.५, पिंजर ४२.३, दहगाव २२.

रामगाव परिसरात मोठे नुकसान
पळसोबढे, कुरणखेड मंडळात झालेल्या पावासाने नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे रामगाव परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले. कपाशी, सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे.

नुकसान भरपाईची मागणी
अतिवृष्टीने अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या शेती नुकसानीची भरपाई राज्य शासनाने तातडीने द्यावी, त्यासाठी तातडीने सर्वेक्षण करावे, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. त्यांनी रामगाव परिसरात भेट देवून शेती नुकसानीची पाहणी केली. त्यांचे समवेत संजय गावंडे, वसंतराव गावंडे, सचिन भरणे, शिवाजी टेके, राजूभाऊ लोडम, नंदकिशोर टेके, पांडुरंग गावंडे, अरुण लोडम, नाना गावंडे, प्राण तायडे, अनंत गावंडे, ज्ञानेश्वर दोड, तुलसीदास टेके, गणेश गावंडे, प्रवीण गावंडे, सागर चौधरी, विजय गोवर्धन गावंडे, अनमोल वसंतराव गावंडे, तलाठी इंगळेताई, ग्रामसेवक देशमुख आदी उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)

loading image