जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधीची फसवणूक

fraud
fraud sakal

अकोला : जास्त व्याज मिळण्याच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी मुंडगावकर ज्वेलर्समध्ये कोट्यवधीची गुंतवणूक केली. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित गुंतवणुकदारांनी मुंडगावकर ज्वेलर्सच्या चार जणांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी (ता.१९) सायंकाळी कोतवाली पोलिसांनी चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (fraud news)

fraud
एका पत्रकाराने हादरवलेले ब्रिटीशांसोबत टाटांचेही साम्राज्य...

मोठ्या प्रमाणात व्याज देण्याचे आमिष देण्यात आल्याने अकोला जिल्ह्यातील शेकडो लोकांनी कोट्यवधी रुपयांची मुंडगावकर ज्वेलर्समध्ये गुंतवणूक केली. ज्वेलर्समध्ये मोठ्या ठेवी ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना वर्षभर व्याज देऊन विश्वास संपादन केला आणि चार कोटी ५७ लाख ८२ हजार ८७९ रुपयांच्या ठेवी घेऊन पोबारा केल्याचा गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून मुंडगावकर ज्वेलर्सच्या चार जणांविरुद्ध बुधवारी (ता.१९) सायंकाळी कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

जुने शहरातील कृष्णा शिवराम मेहरे यांच्यासह ९८ नागरिकांच्या तक्रारीनुसार सराफा बाजारातील मुंडगाव ज्वेलर्सचे मालक अमोल विजय पिंजरकर, उदय विजय पिंजरकर, विजय पिंजरकर आणि त्यांचा मुनीम राजेश ठाकूर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात व्याज देण्याचे आमिष दाखविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या आमिषामुळे जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची त्यांच्या ज्वेलर्सकडे ठेवी जमा केल्या. अमोल पिंजरकर, उदय पिंजरकर, विजय पिंजरकर (मुंडगावकर) यांनी वर्षभर सर्व ठेवीदारांना आकर्षक व्याज दिले. व्याज मिळत असल्याने, आणखी काही लोकांनी हजारो, लाखो रुपयांच्या घरात त्यांच्याकडे ठेवी जमा केल्या.

fraud
Nagar Panchayat | जिल्हा प्रमुखांच्या गावात शिवसेना बाराच्या भावात

परंतु, गत एक महिन्यापासून त्यांच्या सराफा दुकानाला कुलूप लावल्याचे आढळून आले. त्यांचे फोनसुद्धा बंद असल्याने, अनेकांना त्यांची फसवणूक झाल्याची शंका आली. त्यामुळे ठेवीदारांनी चौकशी केली असता, आरोपींनी कोट्यवधी रुपये घेऊन पोबारा केल्याचे समोर आल्याचे ठेविदारांच्या लक्षात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमुद केले. शेकडो ठेवीदारांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यासह पोलिस अधीक्षकांकडे सुद्धा लेखी तक्रारी करून न्याय देण्याची मागणी केली. अखेर बुधवारी (ता.१९) कोतवाली पोलिसांनी चार जणांविरुद्ध भादवि कलम ४२०, ४०६, ३४, एमपीआयडी कायद्याच्या कलम ३, ४ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com