
Municipal Elections
sakal
हिवरखेड : हिवरखेड नगरपरिषदची पहिलीच निवडणूक होणार असून, त्यापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या सोडतीत नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. प्रभाग निहाय सोडतीत ५० टक्के म्हणजे दहा जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे एकूण ११ महिलांच्या हाती हिवरखेड शहराची सूत्रे राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.