

MLA Amol Mitkari’s Surprise Visit to Hivarkhed PHC
Sakal
हिवरखेड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २ डिसेंबररोजी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आकस्मिक भेट दिली. या भेटीत त्यांना केंद्रात अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या असून त्यांनी अवैध गर्भपाताची शक्यता वर्तवली आहे. आमदारांनी केलेल्या आरोपानंतर प्रशासनाची झोपच उडाली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दखल घेत चौकशीसाठी त्रिसदस्य समिती गठीत केली आहे. हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय व्हावे या हिवरखेड विकास मंच आणि जागरूक नागरिकांच्या मागणी वरून आमदार अमोल मिटकरी यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता आणि विधिमंडळात सुद्धा ग्रामीण रुग्णालयाची मागणी रेटून धरली होती.