Hivarkhed Farmers' Issue: पावसाचा खंड वाढवतोय शेतकऱ्यांची चिंता; उभ्या पिकांना पाण्याची प्रतीक्षा; बळीराजा संकटात

Rain Break Raises Concern Among Hivarkhed Farmers: हिवरखेड परिसरात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, तूर आणि कपाशीच्या उभ्या पिकांवर संकट निर्माण झाले आहे. पिके वाचवण्यासाठी सिंचन असलेले शेतकरी प्रयत्न करत असून, कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Hivarkhed Farmers' Issue

Hivarkhed Farmers' Issue

esakal

Updated on

हिवरखेड: आभाळाकडे डोळे लागले आहेत, शेतात पिके उभी आहेत; मात्र पाऊस गायब झाल्याने हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, तूर आणि कपाशीच्या उभ्या पिकांवर संकट निर्माण झाले असून, हाती तोंडाशी आलेला घास हातातून जाणार की काय, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पिके वाचविण्यासाठी पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी रात्रंदिवस धडपड करीत आहेत, तर कोरडवाहू शेतकऱ्यांना आभाळाकडे पाहण्याशिवाय पर्याय नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com