
अकोला : केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आणि राज्याच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांवर पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत केला जातो. त्याचे पैसे सरकारकडून संबंधित रुग्णालयांना दिले जातात. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून रुग्णालयाला निधी मिळाला नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.