नक्षत्रावरून कसा पडतो पाऊस? मृग, मेंढा, उंदीर, म्हैस नावांची गंमत तरी काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नक्षत्रावरून कसा पडतो पाऊस? मृग, मेंढा, उंदीर, म्हैस या नावांची गंमत तरी काय?

नक्षत्रावरून कसा पडतो पाऊस? मृग, मेंढा, उंदीर, म्हैस या नावांची गंमत तरी काय?

अकोला: पावसाची सुरुवात झाली की आपण नक्षत्रांविषयी नक्की ऐकतो अन् बोलतोही. मृग, मेंढा, उंदीर, म्हैस अशी गमतीदार नावं शेतकऱ्यांनी ठेवली आहेत. हवामानशास्त्र कितीही प्रगत झाले तरी पावसाचे अंदाज बांधताना अनेकदा तफावत आढळते अथवा चुकतात. मात्र शेतकऱ्यांना अवगत असलेले प्राचीन ज्ञान सहसा चुकीचे ठरत नाही. या शास्त्राला लिखित स्वरूप नसले तरी पावसाचे तंतोतंत भाकीत करणारी मंडळी गावोगावी असतात. नक्षत्रावरून पाऊस जोडणारी ही कला जितकी उपयुक्त तितकीच मनोरंजक आहे. (How rain falls from the constellation)

पंचाग तसेच अन्य जुन्या साधनानुसार पावसाचा अंदाज बांधला जात आहे. यात प्रत्येक नक्षत्राला वाहन देऊन त्याचप्रमाणे किती पाउस पडेल याचा अंदाजानुसार पावसाची लक्षणे सांगण्यात आली आहेत.

हेही वाचा: अकोला जिल्‍ह्यातील ७७ गावे असुरक्षित; पुराचा धाेका कायम

नक्षत्र वाहन पावसाचे स्वरूप कालावधी

मेंढा

मेंढा

हेही वाचा: Akola; जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत अतिवृष्टीची शक्यता

मृग मेंढा हुलकावणी देणारा 8 जून ते 21 जून

आर्दा हत्ती सरसरी पाऊस 22 जून ते 5 जुलै

हेही वाचा: पेरणीची घाई नको, मॉन्सूनच्या आगमनासाठी आठवडाभराची प्रतीक्षा

पुनर्वसू बेडूक हुलकावणी देणारा 6 जुलै ते 19 जुलै

पुष्य गाढव कुठे जास्त कुठे कमी 20 जुलै ते 2 ऑगस्ट

आश्‍लेषा घोडा सामान्य पाऊस 3 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट

मेघा उंदीर पावसाची उघडझाप 17 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट

पूर्वा हत्ती सरासरी पाऊस 31 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर

उत्तरा मेंढा हुलकावणी देणारा 13 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर

हस्त म्हैस सरासरी पाऊस 27 सप्टेंबर ते 9 ऑक्‍टोबर

चित्रा कोल्हा संमिश्र पाऊस 10 ऑक्‍टोबर ते 23 ऑक्‍टोबर

स्वाती मोर सामान्य पाऊस 24 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर

पाऊस तरणा आणि म्हताराही

पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा’पाऊस तर पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा’ पाऊस असे म्हणतात. आश्लेषा नक्षत्रातील पावसाला ‘आसलकाचा पाऊस’, मघा नक्षत्रातील पावसाला ‘सासू’चा पाऊस, पूर्वा नक्षत्रातील पावसाला ‘सूनां’चा पाऊस, उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘रग्बीचा’ पाऊस तर हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘हत्ती’चा पाऊस अशी नावे आहेत.

How rain falls from the constellation

loading image
go to top