Malkapur News : पुरात वाहून जात असलेल्या पत्नीला वाचविताना पतीचाही गेला जीव; हिंगणाकाझी येथील घटना

नदीच्या पुरात वाहून जात असलेल्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीने पुरात उडी घेतली. दरम्यान या घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना (ता.९) रोजी घडली असून देवधाबा गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
husband lost his life while saving wife in malkapur flood Incident Hingna Kazi
husband lost his life while saving wife in malkapur flood Incident Hingna KaziSakal

मलकापूर : तालुक्यातील हिंगणाकाझी गावाजवळ असलेल्या नदीच्या पुरात वाहून जात असलेल्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीने पुरात उडी घेतली. दरम्यान या घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना (ता.९) रोजी घडली असून देवधाबा गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवधाबा येथील विमल सुभाष शिंदे (वय ५०) ह्या तालुक्यातील विविध गावांमध्ये जावून कटलरी सामान विकण्याचा व्यवसाय करीत होत्या. (ता.९) दुपारी विमलबाई शिंदे देवधाबा येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणाकाझी ता.मलकापूर गावात गेल्या होत्या.

दरम्यान देवधाबा परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने त्यांचे पती सुभाष शिंदे हे पत्नी विमलबाईला आणण्यासासाठी दुचाकीने हिंगणा काझी येथे गेले. संध्याकाळी शिंदे दाम्पत्य परतत असताना हिंगणाकाझी गावाजवळ असलेल्या नदीला पूर आल्याचे दिसून आले.

त्यामुळे त्यांनी मोटारसायकल नदीकाठी ठेवली आणि नदीच्या पात्रातून गावात जाण्याचा निर्णय घेतला. समोर असलेल्या सुभाष शिंदे यांना पत्नी विमलबाई पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पुरात उडी घेऊन पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी घटनास्थळी असलेल्या काही गावकऱ्यांनी धाडस करीत पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या. दरम्यान विमलबाई यांना बाहेर काढण्यात आले. परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. तर पती सुभाष शिंदे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.

husband lost his life while saving wife in malkapur flood Incident Hingna Kazi
Akola Crime : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंतासह दोघांनी थकीत पगार काढण्याकरिता महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

दरम्यान मलकापूर ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले. तसेच महसूल विभागाचे कर्मचारी, आपत्ती बचाव पथक, तलाठी, मंडळ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत पुरात वाहून गेलेल्या सुभाष शिंदे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला.

तर (ता.१०) रोजी पुरात वाहून गेलेल्या सुभाष शिंदे यांचा मृतदेह घटनास्थळापासून तब्बल दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबोळी गावानजीक आढळून आला आहे. गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना देताच पोलिस, महसूल प्रशासन कर्मचारी गावात दाखल झाले पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. आज दुपारी शिंदे पतीपत्नी वर शोकाकुल वातावरणात देवधाबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com