Akola News : पतीने म्हटले, तीनवेळा तलाक अन् विवाहितेला घरातून हाकलले; पतीसह 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल

माहेराहून हुंड्याचे दोन लाख रूपये आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ
husband says divorced three times women out from home case registered against five persons including husband
husband says divorced three times women out from home case registered against five persons including husbandsakal

अकोला: माहेराहून हुंड्याचे दोन लाख रूपये आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेने माहेराहून रोख रक्कम न आणल्याने, पतीने तीनवेळा तलाक म्हटले आणि आता तु माझी पत्नी राहिली नाही. असे म्हणत, घरातून हाकलून दिले. या प्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी पतीसह पाच जणांविरूद्ध सोमवारी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल केला.

बोरगाव मंजू येथे माहेरी राहणाऱ्या उजिमानाज झेनुल आबेदिन(३१) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार अगरवेश जुने शहर अकोला येथील पती झेनुल आवेदिन(४२) जेठ अब्दुल कदिर मु. बशीरोदिन(४४), जेठाणी समीना बी अब्दुल कबीर(३८), चुलत सासरे नशिरोदिन कधीरोदिन(६०), चुलत दीर मोहम्मद अन्सार नसिरुद्दीन(४०) हे नेहमी चारित्र्यावर संशय घेत असून, माहेराहून हुंड्याचे दोन लाख रूपये आणण्याचा तगादा लावत.

तसेच रक्कम न आणल्यामुळे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत, असा आरोप विवाहितेने तक्रारीतून केला आहे. १५ सप्टेंबर रोजी पती झेनुल आवेदिन याने तीनवेळा तलाक म्हणत, आता तु माझी पत्नी राहिली नाही, माझ्या घरी येऊ नको,

असे ओरडून सांगत, घरातून हाकलून दिल्याचा आरोपही तक्रारीतून विवाहितेने केला आहे. या प्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी पतीसह पाच जणांविरूद्ध भादंवि कलम ४९८ अ, ५०४, ५०६(३४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोरगाव मंजुचे ठाणेदार मनोज केदारे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com