esakal | बेकायदेशीर देशी दारूचा उडाला भडका | Illegal Liquor
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

बेकायदेशीर देशी दारूचा उडाला भडका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा - ग्रामपंचायत ठराव ग्रामसभा घेऊनही बेकायदेशीर दारू विक्रीला चाप बसत नाही. दुचाकी वर देशी दारूचे बॉक्स सर्रास पार्सल होत असतानाचा प्रकार असह्य होऊन सरपंच पतीचा राग अनावर झाला. माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल करा, असे म्हणत सरपंच पतीने दारूचे तीन बॉक्स फोडून पेटविले. अवैध दारू वाहतूक साठी वापरणाऱ्या दुचाकीला पेटविण्याचा प्रयत्न केला सदर घटना आज (ता. ९) चिखली तालुक्यातील ईसरुळ येथे घडली.

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस ठाणे अंतर्गत ईसरूळ, तालुका चिखली गावचे सरपंच मीनाताई संतोष भुतेकर यांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेऊनही दारूबंदीला चाप बसत नव्हता. अंढेरा पोलिसांच्या हेतूपुरस्पर दुर्लक्षामुळे गावात देशी दारूचे दुष्परिणाम वाढत होते. अनेक वेळा समजावून सांगूनही सिनगाव जहागीर येथील दारू माफिया यांच्यामार्फत दुचाकीने ईसरुळ गावात दररोज 6 ते 10 बॉक्स बेकायदेशीर दारू विक्री सर्रास सुरूच होती. आज सरपंच पती संतोष भुतेकर यांना गावाची शिव ओलांडून एक दुचाकी तीन बॉक्स घेऊन येताना दिसला.

हेही वाचा: सेवानिवृत्त सैनिकाने ताणली एलआयसी अधिकाऱ्यावर बंदूक

सदर दुचाकी अडवून त्यांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीस जाब विचारला सरपंच पती संतोष भुतेकर यांनी एक-एक करून तिन्ही दारूचे बॉक्स रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडावर फेकून फोडले. संतापलेल्या सरपंचपती यांनी रागाच्या भरात दारू चे बॉक्स फोडून त्याला आग लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार देऊन कुठलाही गुन्हा दाखल करा, मी जुमानत नाही, असे म्हणून त्यांनी माचीसच्या डब्यातून आगगाडी काढून दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीला ही पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी त्यांना रोखले संतप्त झालेल्या सरपंच पतीचा रुद्रावतार पाहून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराने धूम ठोकली. सदर प्रकारानंतर अंढेरा पोलीस मंगरूळ येथील त्या दुचाकीस्वाराचा विरुद्ध तसेच सिनगाव जहागीर येथील दारू माफिया विरुद्ध काय कारवाई करतात याकडे ईसरुळ कर यांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top