esakal | निर्जनस्‍थळी पोत्‍यामध्ये आढळला मृतदेह; अनैतिक संबंधातून महिलेचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

निर्जनस्‍थळी पोत्‍यामध्ये आढळला मृतदेह; अनैतिक संबंधातून खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : तालुक्यातील ग्राम गाडेगाव खुर्द ते खांडवी रस्त्यावरील नाल्याच्या पुलाखाली अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गाडेगाव खुर्द येथील पोलिस पाटील राहुल नामदेव निंबाळकर यांनी नाल्याच्या पुलाखाली कोण्यातरी अज्ञात महिलेचा मृतदेह पोत्यामध्ये असल्‍याची माहिती दिली. पिंकी ऊर्फ सुरेखा नितवणे (रा. मुक्ताईनगर, ता. हिवरा) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासचक्रे फिरविली असता संजय पारस्कर (रा. टाकळी पारसकर) यांच्‍या शेतामध्ये चार-पाच दिवसांअगोदर काम करण्यासाठी नंदू ऊर्फ कैलास जवंजाळ (रा. मुक्ताईनगर, ता. हिवरा) या व्यक्तीला महिलेसोबत कामावर ठेवले होते. नंदू जवंजाळ याच्या सामानाची झडती घेतली असता मृत महिलेची माहिती मिळाली.

महिलेचे माहेर जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथे आहे. मृत महिलेचे लग्न पंधरा वर्षांआधी हिवरा येथे झाले होते. परंतु, सात ते आठ वर्षांआधी मृत महिलेच्या पतीचे निधन झाल्याने नंदू ऊर्फ कैलास जवंजाळ याच्या संपर्कात होती. पाच ते सहा महिन्यांपासून मृत सुरेखा व कैलास जवंजाळ हे दोघे आसलगाव येथे राहत होते.

हेही वाचा: पाचही मुलीच झाल्याने तलाक, तलाक, तलाक

पाच ते सहा दिवसांअगोदर टाकळी पारसकर येथे संजय पारस्कर यांच्या शेतात मुक्कामी कामासाठी गेले होते. त्‍यानंतर सुरेखाचा मृतदेह अशा अवस्‍थेत आढळून आला. तिच्‍या सोबत राहणारा व्यक्ती म्हणजेच कैलास फरार असून, पुढील तपास उपविभागीय अधिकारी अभिनव त्यागी यांच्या आदेशानुसार ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे, पोलिस नाईक, अनिल सुशीर, पोलिस शिपाई सचिन राजपूत करीत आहेत.

माणुसकीचे दर्शन

मृतदेहावर अंत्यसंस्‍कार करण्यासाठी नातेवाइकांनी नकार दिल्याने जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर, पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे, हेड कॉन्स्टेबल विनोद वानखडे, अमोल वनारे, योगेश निंबोळकार, सचिन राजपूत, नीलेश पुंडे, सुनील वावगे आदींनी महिलेवर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवले.

loading image
go to top