

Nagpur–Pune Rail Services Disrupted Due to Track Work
Sakal
अकोला : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड आणि काष्टी दरम्यान रेल्वे रूळाच्या दुहेरीकरणाचे काम जानेवारी महिन्याच्या शेवटी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-नागपूर मार्गावरील वाहतूक प्रभावित होणार असून काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचा फटका स्थानिक प्रवाशांना बसणार आहे.