
अकाेला : चार महिन्यात ५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अकाेला : शेतमालाला न मिळणारा भाव, कर्जाचा वाढता डाेंगर आदींमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हाेत असून, यंदा अतिवृष्टीच्यार चार महिन्यात तब्बल ५० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याचे समाेर आले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची मदतही वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत साडतात.
निसर्गाच्या लहरीपणा जिल्ह्यात दरवर्षी शेतमालाचे उत्पादन घटते. परिणामी मशागत व पेरणीसाठीचा खर्चही प्राप्त हाेणाऱ्या उत्पन्नातून भागत नाही. थकित कर्ज फेडल्या जात नसल्याने बँक शेतकऱ्यांना पीक कर्जही देत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांकडे खासगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याशिवाय पर्याय नसताे. परिणामी शेतकरी आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलताे.
हेही वाचा: नांदेड : महापालिकेच्या शाळांनाचांगल्या सुविधा देणार
फेरतपासणी नाही
मदतीसाठी अपात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणांची फेरतपासणी करण्याचा आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी ता. २८ ऑगस्ट राेजी पार पडलेल्या आढावा बैठकित अधिकाऱ्यांना दिला हाेता. कर्ज व नापिकी असल्यास अन्य कारणांमुळे प्रकरण अपात्र ठरविण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले हाेता. मात्र नंतर या अादेशाचे काय झाले हे, अद्याप पुढे आलेले नाही.
पेरणीनंतर सर्वाधिक आत्महत्या
यंदा जुलै ते ऑक्टाेबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अताेनात नुकसान झाले. उत्पादन प्रचंड घटल्याने लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. जुलै त ऑक्टाेबर दरम्यान ५० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल. जुलै महिन्यात ११, ऑगस्ट-०९, सप्टेंबर-११ आणि ऑक्टाेबर महिन्यात १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
Web Title: In Four Months 50 Farmers Commit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..