esakal | सहा महिन्यात ६० हजार वाहनचालकांनी मोडले नियम
sakal

बोलून बातमी शोधा

सहा महिन्यात ६० हजार वाहनचालकांनी मोडले नियम

सहा महिन्यात ६० हजार वाहनचालकांनी मोडले नियम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणू संसर्गामुळे लादण्यात आलेल्या नियमावलीचा भंग करून वाहनचालविणाऱ्या ६० हजार वाहनचालकांना गत सहा महिन्यात दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. शहर वाहतूक शाखेने पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वात केलेल्या या कारवाईतून तब्बल ४१ लाखांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. शहर वाहतूक शाखेच्या इतिहासातील आतापर्यंतही ही सर्वोच्च कारवाई आहे. (In six months, 60,000 drivers broke the rules)


शहर वाहतूक शाखा अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत सहा महिन्यातील सर्वोच्च कामगिरी पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वात नोंदविण्यात आली. यावर्षी पहिल्या सहा महिन्यातच म्हणजे १ जावेवारी ते ३० जून या काळात तब्बल ६० हजार ३१६ वाहनचाकल नियम मोंडताना वाहतूक शाखेच्या कारवाईच्या जाळ्यात अडकलेत. त्यातून शहर वाहतूक शाखेने एकूण ४१ लाखांचे वर महसूल वसूल केला. महसूल वसुलीतही शहर वाहतूक शाखेची ही आतापर्यंतची सर्वोच्च कारवाई ठरली आहे. या दंडात्मक कारवाया पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे निर्देशाप्रमाणे व अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व शहर वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिस अंमलदार यांनी केल्या आहेत.

हेही वाचा: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्ह

न वसुल झालेली रक्कमही मोठी
सन २०१९ च्या मे महिन्यापासून वाहतूक शाखेच्या दंडात्मक कारवाईसाठी ई-चालन मशीनचा वापर करण्यात येतो. ज्यामध्ये चालन करते वेळी वाहनचालक हजर नसेल तर किंवा त्याचे जवळ त्यावेळी दंड भरण्यासाठी पैसे नसतील तर तो नंतर महाराष्ट्रात कोठेही या दंडाची रक्कम भरू शकतो. ही सवलत देण्यात आल्याने अशा बाकी असलेल्या दंडाच्या रकमेचा आकडासुद्धा मोठा आहे. ही बाकी असलेल्या दंडाची वसुली करण्यासाठी अशा वाहन चालकांच्या निवास स्थानी लेखी नोटीस वाहतूक शाखेकडून पाठविण्यात येत असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले.

अडचणीवर मात करीत कारवाई
अकोला शहरातील मुख्य रस्ता असलेल्या नेहरु पार्क ते रेल्वे स्थानक चौकापर्यंत रस्ता दुरुस्तीची काम आहेत. त्यातच उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना सतत कार्यरत रहावे लागत आहे. अशा अनेक अडचणीवर मात करीत वाहतूक पोलिसांनी ही विक्रमी कारवाई केली आहे.

मागिल दहा वर्षांत अशी झाली कारवाई
वर्ष कारवाई दंड वसुली
२०२१ ४३ हजार ४४० ६३ लाख ७८ हजार ६५०
२०१३ ३१ हजार ५१३ ४५ लाख ५० हजार ३००
२०१४ ३३ हजार ९८९ ४६ लाख ३९ हजार ८००
२०१५ ४३ हजार ५१० ५८ लाख ३० हजार ३५०
२०१६ ५० हजार ३४४ ७७ लाख ७८ हजार ८००
२०१७ ५७ हजार ३१९ १४३ लाख ८२ हजार ७००
२०१८ ६३ हजार ५६७ १५८ लाख सहा हजार ४००
२०१९ ५९ हजार ५५६ १२२ लाख ५८ हजार ९००
२०२० ७४ हजार १२८ ७१ लाख ९४ हजार ६००

संपादन - विवेक मेतकर

In six months, 60,000 drivers broke the rules

loading image