
अकोल्यात परिचारिका संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
अकाेला : वेतन रखडल्याने जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमनी जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. वेतनासह अनेक मागण्या प्रलंबित आहे. त्यामुळे परिचारिका आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.संघटनेच्या प्रश्नांवर दीर्घकालीन ताेडगा निघत नसल्याने उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डाटा एंट्री ऑपरेटर नेमण्यात यावेत, आरोग्य सेविकेच्या नावाने आलेले उपकेंद्रस्तरावरील अनमोल टॅब परत करण्याबाबत मागणी पूर्ण करावी, यासह अन्य मागण्यांबाबत नर्सेस संघटनेने ता. २७ ऑक्टाेबर राेजी कामबंद आंदोलन केले होते. प्रशासनाने मागण्यांबाबत आश्वासन दिले. मात्र, वेळेवर वेतन हाेण्यासह अन्य मागण्या पूर्ण हाेताना दिसून येत नाही. त्यामुळे नर्सेस संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसाेले यांची भेट घेतली. किमान पाच तारखेच्या आत वेतन व्हावेत, अशी मागणी संघटनेने केली.
हेही वाचा: सोलापूर : गोउत्पादनाचे भाव पोहोचले दुपटीवर
पाच तारखेच्या आत हवे वेतन
कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर आराेग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःचे आरोग्य धोक्यात टाकत सेवा दिली व देत आहे. त्यामुळे किमान पाच तारखेच्या आत तरी वेतन अदा हाेणे आवश्यक आहे. राज्यात अन्य जिल्ह्यामंध्येही वेतन वेळेवर हाेते. मात्र, अकोला जिल्हा परिषदेमध्ये वेळेवर वेतन का हाेत नाही नाही, असा प्रश्न नर्सेस संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा: अकोला : खरीपात ७३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन!
शासन आदेशाची पायमल्ली
आराेग्य उपसंचालक कार्यालयाकडून वेतन अनुदान जारी हाेते. जिल्हा आरोग्य कार्यालय वेतानाचे अनुदानातून वैद्यकीय परिपूर्ती, थकबाकीा, रजा रोखीकरण या सारख्या थकीत देयकसाठी खर्च करीत असल्याने वेतनासाठी अनुदान कमी पडते आणि वेतन देयके वेळेवर अदा होत नाही, असा दावा संघटनांनी केला आहे. वेतनाशिवाय इतर देयके वित्त विभागाच्या परवानगीशिवाय अदा करण्यात येऊ नयेत, या शासना आदेशाची पायमल्ली होत असल्याचा दावाही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
Web Title: In The Sanctity Of The Nurses Association Movement In Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..