सोलापूर : गोउत्पादनाचे भाव पोहोचले दुपटीवर

सेंद्रिय शेती अन्‌ औषध निर्मितीसाठी वाढली मागणी
cow
cowsakal
Updated on

सोलापूर : शहरातील बाजारात सेंद्रिय शेतीतून वाढलेल्या मागणीमुळे गाईच्या शेणाच्या पावडरचे भाव दहा रुपयांनी वाढले आहेत. तसेच खिलार गाईचे तूप तीन हजार रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. बाजारात मागणी अधिक पण पुरवठा कमी झाल्याने गाईच्या उत्पादनाचे भाव वाढले आहेत.

cow
सोलापूरात हमीपत्रावर मिळणार गुंठेवारीला परवानगी ?

मागील काही दिवसात शहरात गो-उत्पादनाच्या बाजारात उत्पादने महागली आहेत. कच्चा मालाची कमतरता झाली आहे. गाईच्या शेणाची मागणी ही सेंद्रीय शेतीसाठी वाढत चालली आहे. शेतकऱ्यांची धाव सेंद्रीय शेतीकडे आहे. त्या तुलनेत गोशाळा अत्यंत कमी संख्येने आहेत. त्यामुळे गाईचे शेण मिळण्याची अडचण झाली आहे. फळबागासह आता इतर प्रकारची सेंद्रीय पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे. घरगुती बागामध्येदेखील खत निर्मितीसाठी मागणी केली जात आहे.

cow
‘पीएमआरडीए’च्या गुंठेवारीला मिळेना मुहूर्त

त्यासोबत इतर गोउत्पादनामध्ये मूर्ती, वस्तू, साहित्य, शोभीवंत वस्तू, साबण यासारखे शेकडो वस्तू तयार केल्या जात आहेत. त्यासाठी वाळलेल्या शेणाचे पावडर आवश्‍यक असते. मागील महिन्यापासून ते बाजारात मिळत नाही. त्यामुळे उत्पादकांनी त्याचे भाव २० रुपयांच्या ऐवजी ३० रुपये केले आहेत. पंचगव्य औषधी उत्पादनासाठी गोमूत्र अर्काचे दर वाढले आहेत. गाईच्या शेणाच्या गोवऱ्याची किंमत देखील वाढली आहे. खिलार गोवंशाच्या दूध उत्पादन अत्यंत कमी असल्याने त्याच्या या गाईच्या तुपाचे भावदेखील तीन हजार रुपयेपर्यंत वाढले आहेत. त्यातच बांधकाम क्षेत्रात विटा, प्लास्टर व रंग निर्मितीचा टक्का वाढल्याने त्यात भरच पडली आहे.

ठळक बाबी

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी सेंद्रिय शेती व औषध निर्मितीसाठी अधिक मागणी दूध व तुपाच्या किमतीतदेखील वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com