कोरोना रुग्णांवर चुकीचे उपचार; डॉक्टरवर कारवाई, २५ लाखांचा औषधी साठा जप्त

कोरोना रुग्णांवर चुकीचे उपचार; डॉक्टरवर कारवाई, २५ लाखांचा औषधी साठा जप्त


कारंजा (जि.वाशीम) ः कारंजा शहरातील गवळीपुरा स्थित एका डॉक्टरवर स्थानिक वैद्यकीय, महसूल, पोलिस, भूमिअभिलेख विभागाच्या प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांन्वे सदरहू डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन संयुक्तरित्या कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना तपासणीबाबत सूचना न देता त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करत असल्यामुळे रुग्ण दगावतात असल्याबाबतच्या तक्रार तालुकास्तरीय समितीस प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. (Incorrect treatment of corona at Washim; Action on the doctor)


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारंजा शहरातील गवळीपुरा येथील एस.एम. खान सिद्दीकी यांचे रौशन क्लिनिक येथे रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष गटविकास अधिकारी कालिदास तापी, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण जाधव, डॉ.वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक भाऊसाहेब लहाने, डॉ.वाघमारे, नायब तहसीलदार विलास जाधव, तलाठी महेश धानोरकर, अमोल वक्ते, आरोग्य अधिकारी श्रीराव, आरोग्य सेवक मुदे, तसेच पोलिस कर्मचारी लोणकर, विनोद महाकाळ, छाया पगृत यांनी पाहणी केली असता, रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा, अलोपॅथिक औषधे देण्याचा, औषधाचा साठा करण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी अधिकार कक्षे बाहेर जाऊन गैरकायदेशीरपणे कामकाज केल्याचे आढळून आले.

कोरोना रुग्णांवर चुकीचे उपचार; डॉक्टरवर कारवाई, २५ लाखांचा औषधी साठा जप्त
वाशीम; जऊळका रेल्वे येथे दोन गटात हाणामारी

दवाखन्यामध्ये ज्या रुग्णांची तपासणी अहवाल आढळले त्यावरून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर सुद्धा येथे उपचार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. सदर बाबीची माहिती तहसीलदार धिरज मांजरे व पोलिस निरीक्षक सतीश पाटील यांना देण्यात आली. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी पाहणी करून उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांना माहिती दिली. उपविभागीय अधिकारी यांचे सूचनेनुसार तहसीलदारांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी मेटकरी यांना कारवाई बाबतच्या सूचना दिल्या. यावेळी रुग्णालयात एक छोटा ॲटो भरेल इतक्या औषधांचा विनापरवाना साठा आढळून आला. गैरकायदेशीरपणे रुग्णावर कोरोना उपचार करून व अंदाजे २५ लाख रुपयांचा औषधी साठा जमा ठेवून रुग्णाच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बनावट डॉक्टरवर रुग्ण कल्याण समिती व अन्न व प्रशासन विभाग यांचेकडून कारवाई करण्यात आली.

संपादन - विवेक मेतकर

Incorrect treatment of corona at Washim; Action on the doctor

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com