
Akola Hospital
sakal
श्रीकांत राऊत
अकोला : सर्वोपचार रुग्णालय परिसरात काही दिवसांपासून अश्लील चाळे घडत आहेत. समता लॉनच्या जागेवर रुग्ण व नातेवाईकांसाठी विश्रांती घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही समाजकंटकांनी गैरप्रकार सुरू केले आहेत. चार दिवसांपूर्वी घडलेल्या अश्लील कृत्याचा व्हिडिओ समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.