शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र विदर्भच पर्याय! मदत देण्यात सरकार अपयशी

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र विदर्भच पर्याय! मदत देण्यात सरकार अपयशी
Updated on: 

अकोला : काही दिवसांपासून विदर्भात विक्रमी पाऊस होतोय. ढगफुटीमुळे भंडारा, नागपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ जिल्ह्यात महापूर आला. तब्बल २७ वर्षांनंतर विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली. सन १९९४ च्या काळानंतर आलेला हा सर्वांत मोठा पूर आहे. असे असताना शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना मदत देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र विदर्भ हाच पर्याय असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी व्यक्त केले.

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, अनेकांचे बळीही घेतले आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत केली जात आहे. मात्र, विदर्भातील नागरिक आणि शेतकरी, व्यापारी मात्र वाऱ्यावर सोडले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र विदर्भच पर्याय! मदत देण्यात सरकार अपयशी
प्रसूती होताच बाळाचा मृत्यू, डॉक्टरांच्या हातातून बाळ पडल्याचा मातेचा आरोप

विदर्भातील पुरासाठी ९०० कोटींची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आणि केंद्राने केवळ १५१ कोटी दिल्याचे राज्य सरकार सांगते. विदर्भातील अन्याय कायम असून, असमतोल आणि समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्यात. पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट, जि. प. अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट आदींची उपस्थिती होती.

चंद्रपूरची घटना माणुसकीला काळिमा फासणारी

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथून १२ किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणाच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. ही अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कलंकित करणारी घटना असल्याचे रेखाताई ठाकूर म्हणाल्यात. या घटनेबाबत पोलिसांकडून पाळण्यात येत असलेली गोपनीयता ही संशयास्पद भूमिकेकडे बोट दाखवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com