प्रेरणादायी विवाह; ठाणेदार झाले वधू पिता, विस्तार अधिकारी मामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेरणादायी विवाह; ठाणेदार झाले वधू पिता, विस्तार अधिकारी मामा

प्रेरणादायी विवाह; ठाणेदार झाले वधू पिता, विस्तार अधिकारी मामा

मानोरा (जि.वाशीम) : जेमतेम पाच-सहा वर्षांची असतानाचा दीक्षाचं पितृछत्र हरवलं. कुटुंबाची जबाबदारी आईवर आली. मात्र, सहा महिन्यांपूर्वी वडीलांप्रमाणेच दूर्धर आजाराने आईचेही निधन झाले. अशा कठीण प्रसंगी निराधार झालेला खरा आधार मिळाला तो गावाचाच. कारखेडा ग्रामपंचायतीनं दीक्षाची जबाबदारी स्विकारत तिच्या शिक्षणासाठीही पुढाकार घेतला. (Inspirational marriage; Karkheda Gram Panchayat in Washim took responsibility for the marriage of an orphan girl)

खरं तर कालचा दिवस दीक्षासाठी खूप महत्त्वाचा होता. आई-वडीलांच्या मृत्यूनंतर दीक्षाच्या विवाहासाठी ग्रामपंचायतनं पुढाकार घेतला होता. दीक्षाच्या विवाहासाठी वधूपित्याची भूमिका ठाणेदार शिशिर मानकर यांनी स्विकारत कन्यादान केले. एवढंच काय तर मुलीचे मामा म्हणून विस्तार अधिकारी संजय भगत यांनी जबाबदारी स्विकारली.

कारखेडा ग्रामपंचायतने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडला. सोमवारी (ता. ३१) दीक्षाचा विवाह नांदेड जिल्हातील माहूर तालुक्यातील पडसा या गावातील निखिल गावंडे या युवकाशी जुळल्याने गावच्या सरपंचा सोनाली सोळंके यांनी ग्रामपंचायतचा रीतसर ठराव घेऊन दीक्षाच्या लग्नाचा रीतसर खर्च उचलला.

प्रेरणादायी विवाह सोहळा

गावच्या महिला सरपंचा सोनाली सोळंके यांनी निराधार मुलीचे कन्यादान व सोयरपन प्रशासनाने स्विकारल्याने हा विवाह सोहळा प्रेरणा देणारा ठरला.

आई वडील गेल्याची खंत जाणवली नाही.

आई-वडील लहानपणीच गेले. ग्रामपंचायतीने पालकत्व स्विकारून ठाणेदारांनी वडीलांची भूमिका पार पाडली. सर्वांच्या प्रेम आणि सहकार्यामुळे आई वडील गेल्याची खंत जाणवली नसल्याचं दीक्षानं यावेळी सांगितलं.

हेही वाचा: Video: जपान, कोरिया, अमेरिकेतील माजी विद्यार्थ्यांचा अकोल्यातील 'अन्नपेढी'स मदतीचा हात!

ठाणेदार झाले भाऊक

मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिशीर मानकर यांना मुलगी नाही, हा सर्व प्रसंग पाहून कन्यादानाची संधी मिळाल्याने ठाणेदार भाऊक झाले. कारखेडा ग्रामपंचायतीने हाती घेतलेलं काम अभिनव आहे. सरपंचांची गाव प्रमुख म्हणून मोलाची वाटते. इतर ग्रमपंचायतींनी कारखेडा गावाची प्रेरणा घेत सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा, असेही ठाणेदार मानकर विवाह प्रसंगी म्हणाले.

संपादन - विवेक मेतकर

Inspirational marriage; Karkheda Gram Panchayat in Washim took responsibility for the marriage of an orphan girl

टॅग्स :Washim