Video: जपान, कोरिया, अमेरिकेतील माजी विद्यार्थ्यांचा अकोल्यातील 'अन्नपेढी'स मदतीचा हात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video: जपान, कोरिया, अमेरिकेतील माजी विद्यार्थ्यांचा अकोल्यातील 'अन्नपेढी'स मदतीचा हात!

Video: जपान, कोरिया, अमेरिकेतील माजी विद्यार्थ्यांचा अकोल्यातील 'अन्नपेढी'स मदतीचा हात!

अकोला : समाजामध्ये सामाजिक मूल्य रुजवणारा एक मुल्यवान पेशा म्हणजे शिक्षकी पेशा (Teachers). शालेय जीवनातून जात असताना अनेकांना शिक्षक व्हावे असं वाटत असते. पण शिक्षक फक्त ज्ञनदानच करत नाहीत तर समाजातिल कठीण प्रसंगात स्वतः भूमिका घेऊन अग्रेसर होत असतो. अकोल्यात काही शिक्षकांनी मिळून एक असा उपक्रम सुरू केलाय की त्यातून हजारोंची भूक तर क्षमतेच याशिवाय देश-विदेशातून मदतही मिळत आहे. चला तर, पाहूया काय आहे हा उपक्रम...

अकोल्यातील Akola दापुरा केंद्रातील 35 शिक्षकांनी (Teachers in Dapura Center) एकत्र येत पैसे गोळा करून कोरोना Corona संकटाच्या काळात जिल्ह्यातील गरजू आणि रुग्णांच्या नातेवाइकांसाठी अन्नपेढी food bank सुरू केली. आज दररोज या अन्नपेढीतून चविष्ट असे जेवणाचे डबे शिक्षक स्वतः गरजूना पुरवतात. विशेष म्हणजे शिक्षिका स्वतः स्वयंपाक करण्यासाठी हातभार लावत आहेत. या उपक्रमाबद्दल ऐकून याच शिक्षकांच्या माजी विद्यार्थ्यांनी अमेरिका, जपान आणि कोरीयातून आर्थिक मदत पाठविली असल्याने शिक्षकांचेही मनोबल उंचावले आहे. (Teachers started a food bank in akola Financial aid from abroad)

हेही वाचा: इंग्रजी राजवटीतील दुर्मिळ १० हजाराची नोट जपलीय अकोल्याच्या संग्रहात

व्हाट्सअपवर मिळते जेवणाचा डबा

कोरोनाच्या संकटात हातावर पोट असणाऱ्यांचे एक वेळ जेवणाच्या अडचणी होत आहेत. तसेच कोरोना झालेले अनेक जण आज रुग्णालयात भरती आहेत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था होत नाही. अशा कुटुंबीय व नातेवाइकांसाठी मोफत जेवणाचा डबा पुरविण्याचा प्रेरणादायी उपक्रम शिक्षकांनी सुरू केला आहे. डब्यासाठी नोंदणी करायची असल्यास शिक्षकांनी आपले व्हॉट्सअप (Whatsapp) नंबर दिले आहेत.

हेही वाचा: वडीलांचे हार्टअटॅकने तर सहा महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू

शिक्षक स्वतःच पोहचवितात डबा

या नंबरवर कॉल केल्यास गरजुंना डबा पुरवला जात आहे. त्या ठिकाणी स्वतः शिक्षक डबा पोहचून देतात आणि विशेष म्हणजे या उपक्रमात शिक्षिका आपले घरचे काम सांभाळून स्वतः स्वयंपाक बनवण्यासाठी हातभार लावत आहेत. सुरुवातीला हा उपक्रम केवळ शिक्षकांसाठी होता आता मात्र कुणालाही जेवणाचा डबा लागल्यास एका फोनवर डबा मिळत आहे.

हेही वाचा: अकोल्याच्या गल्ली बोळांत आढळली इतिहासातील सोनेरी पानं!

अन्नपेढीसाठी केली वर्गणी गोळा

शिक्षकीपेशा सोबतच दु:खी, पीडितांच्या तोंडी अन्नाचे दोन घास खाऊ घालण्याच्या या उपक्रमाला शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या अन्नपेढीसाठी शिक्षक वर्गणी गोळा करून आपल्या सहकारी शिक्षकांना मदतीचा हात देत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद तर आहेच, शिवाय प्रेरणादायी सुद्धा आहे.

शिक्षकांचे जिल्हाभरातून कौतुक

कोरोना मुळे शाळा बंद असल्याने जिल्हा परिषद शिक्षकांनी समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही हा उपक्रम चालूच ठेवण्याची आशा त्यांनी बोलून दाखवली. केंद्रप्रमुख श्रीकृष्ण गावंडे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.