लसीकरण जनजागृतीत विद्यार्थ्यांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

Akola : लसीकरण जनजागृतीत विद्यार्थ्यांचा सहभाग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोविड लसीकरण प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांव्दारे जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. लसीकरण जनजागृती मोहीम उत्कृष्टपणे राबविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासनाव्दारे बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिली.

जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण १०० टक्के करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्याव्दारे जनजागृती करतील. उत्कृष्टपणे जनजागृती करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासनाच्यावतीने प्रमाणपत्र व काही विद्यार्थ्याना टॅब बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत जे विद्यार्थी जनजागृती करतील त्यांनी कुटुंबातील किंवा परिसरातील व्यक्तीच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील. एका व्यक्तीचे प्रमाणपत्र एकच विद्यार्थी सादर करेल याची खात्री शाळेचे मुख्याध्यापक करतील. विद्यार्थ्यांनी ता.१२ नोव्हेंबरनंतर जनजागृती करून लसीकरण झालेल्या व्यक्तींची अचूक माहिती सादर करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील. या मोहिमेचा कालावधी ता.१५ नोव्हेंबरपर्यंत तर बक्षीस वितरण कार्यक्रम नोव्हेंबर अखेर राहिल.

एका दिवसातील सर्वाधिक लसीकरण

जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या उद्देशाने व ३० नोव्हेंबरपर्यंत किमान एक डोजचे १०० टक्के लक्ष्यांक गाठण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेमुळे अकोला जिल्ह्यात एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक डोज शनिवारी देण्यात आले. शनिवारी जिल्ह्यात १८ हजार ९२२ नागरिकांचे लसीकरण विविध केंद्रांवर करण्यात आले. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२ लाख दोन हजार ७०८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात पहिला डोज घेणारे आठ लाख २० हजार ४३२ तर दुसरा डोज घेणारे तीन लाख ८२ हजार २७६ नागरिकांचा समावेश आहे.

loading image
go to top