esakal | अकोला जिल्ह्यातील १० पोलिस स्टेशनला आयएसओ मानांकन जाहिर

बोलून बातमी शोधा

अकोला जिल्ह्यातील १० पोलिस स्टेशनला आयएसओ मानांकन जाहिर

सध्या कायदा व सुव्यवस्था राखणं, गुन्हे घडू नये म्हणून प्रयत्न करणं, गुन्हा घडल्यास त्या गुन्ह्याचा जलद तपास करणं, तसेच पोलिस स्थानकांत येणार्‍या सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींची पूर्णपणे दखल घेऊन त्याचं निवारण्यासाठी पोलिस तत्पर असल्याचं या पुरस्कारानंतर दिसून येतंय.

अकोला जिल्ह्यातील १० पोलिस स्टेशनला आयएसओ मानांकन जाहिर
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

अकोला : अकोट शहर, उरळ, हिवरखेड, मूर्तिजापुर शहर आणि चान्नी या पाच पोलिस स्टेशनला आयएसओ मानांकन ((ISO certification announced) देण्यात आला आहे. तर पातुर, बोरगांव मंजू, डाबकी रोड, एमआयडीसी आणि बार्शीटाकळी या पोलिस स्टेशनचेही (police stations) आयएसओ ((ISO) मानांकनकरिता निवड झालीय. (ISO certification announced for 10 police stations in Akola district)

हेही वाचा: शासनाची मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनीच केली रस्ता दुरूस्ती

सध्या कायदा व सुव्यवस्था राखणं, गुन्हे घडू नये म्हणून प्रयत्न करणं, गुन्हा घडल्यास त्या गुन्ह्याचा जलद तपास करणं, तसेच पोलिस स्थानकांत येणार्‍या सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींची पूर्णपणे दखल घेऊन त्याचं निवारण्यासाठी पोलिस तत्पर असल्याचं या पुरस्कारानंतर दिसून येतंय. जिल्ह्यात सायबर गुन्हे, फसवणुकीचे गुन्हे घडू नयेत, या दृष्टीकोनातून जनजागृती करण्यावर भर दिला गेला. दरम्यान, सर्वसोईसुविधांनी परिपूर्ण असलेल्या व्यवस्थांमुळे या ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यांना तणावमुक्त तसेच अधिक उत्साहानं काम करण्यास वाव मिळालाय. यापुढंही जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसविण्यास पोलिसांना यश मिळावे, हीच शुभेच्छा.