
Janani Suraksha Scheme
sakal
अकोला : गर्भवती मातांसाठी असलेल्या जननी सुरक्षा योजनेचा पैसा गिळंकृत केल्याचा धक्कादायक प्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आला आहे. तब्बल अकरा लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम थेट स्वतःच्या खात्यात वळवल्याचा गंभीर आरोप महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्यासह इतर तिघांवर झाला असून या प्रकरणाची चौकशी सध्या अमरावती येथील तीन सदस्यीय समितीमार्फत सुरू आहे. सोमवारी (ता.२९) या प्रकरणाशी संबंधित काही अधिकारी व तक्रारदारांचे जबाब नोंदवले आहेत.