esakal | Akola : मोबाइल चोरीचे झारखंड ‘कनेक्शन’
sakal

बोलून बातमी शोधा

akola

अकोल्यातील मोबाइल चोरीचे झारखंड ‘कनेक्शन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. बहुतांश मोबाइलचा शोध घेण्यात पोलिसांना पाहिजे यश येत नाही. अकोला जिल्ह्यातील पातूर पोलिसांनी मात्र मोबाइल चोरीचे झारखंड कनेक्शन शोधन थेट झारखंडेमध्ये जाऊन दोघांना ताब्यात घेतले.

पातूर पोलिस ठाण्यात संतोष लसनकार यांनी आठवडीबाजारातून त्यांचा मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता सायबर पोलिसांच्या मदतीने लोकेशन झारखंड येथील साहेबगंज येथील आल्याने पोलिसांचे एक पथक साहेबगंज येथे गेले. तेथून पोलिसांनी जितेंद्र छोटेलाल साहणी (२५), मुकेश रामचंद्र महतो (३०) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी मोबाइल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे चार मोबाइल जप्त केले आहेत. या आरोपींनी पोलिसांकडे कबुल केले की राज्यातील इतर शहरांमधूनही मोबाइल चोरले आहेत. पोलिस या आरोपींची सखोल चौकशी करीत असून, त्यांच्याकडून आणखी काही चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top