अकोला : कारूण्यसिंधूचा वैचारिक प्रवाह खळखळत राहील! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhutai Sapkal
अकोला : कारूण्यसिंधूचा वैचारिक प्रवाह खळखळत राहील!

अकोला : कारूण्यसिंधूचा वैचारिक प्रवाह खळखळत राहील!

अकोला : अनाथांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय प्रवाहात ठेवणारी अनाथांची माय असणारी नुसती सिंधू नव्हती तर कारूण्यसिंधू होती. आपल्यापासून हा सिंधूचा प्रवाह दूर जरी गेला असला तरी चैतन्याने खळखळ वाहणाऱ्या या सिंधुताईंच्या(Sindhutai Sapkal) या दैवी कार्यापासून प्रेरणा घेवून अशा शेकडो सिंधू पुनश्च तयार होवोत, अशी भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र अहीर गवळी संघटना अकोलातर्फे सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal)यांना वाहण्यात आली.

हेही वाचा: सर्वसामान्यांचा Corporate FDमध्ये वाढता इंटरेस्ट!

अतिशय मनमिळाऊ, गवळी समाजात जन्मलेली एक साधी आणि सरळ बोलीभाषा बोलणारी मराठमोळी महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणारी सिंधूताई सपकाळ पुन्हा जन्माला येणे नाही. सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढले आणि माहेरच्यांनी परतीचा मार्ग बंद केला. आप्त परिवार असताना तिला अनाथ केलेल्या समाजाला जिने पद्मश्री पुरस्काराची उंची दाखविली अशी माय जी अनाथांच्या हजारो परिवाराची माय झाली, अनाथांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय प्रवाहात ठेवणारी अनाथांची माय असणारी नुसती सिंधू नव्हती तर कारूण्यसिंधू होती.(akola news)

हेही वाचा: सोलापूर : कोरोनात पोटभर अन्नासाठी सर्वसामान्यांचा संघर्ष!

आपल्यापासून हा सिंधूचा प्रवाह दूर जरी गेला असला तरी चैतन्याने खळखळ वाहणाऱ्या या सिंधुताईंच्या या दैवी कार्यापासून प्रेरणा घेवून अशा शेकडो सिंधू पुनश्च तयार होवोत, अशी अपेक्षा महाराष्ट्र अहीर गवळी संघटनेतर्फे प्रदीप गुरुखुद्दे यांनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्यात. गंभीर परिस्थितीत गांभीर्याने पाउल उचलताना दारोदारी भीक मागून आपल्या सारख्या अनेक अनाथांची संसार उभी करणारी स्वतः सिंधुताई हरपली. वयाच्या ७३ व्या वर्षी सिंधुताई यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा: सोलापूर : शासनाने बाळंतपणासाठी दाखवली सरकारी रुग्णालयांची वाट

महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आरंभीस करतांना अनाथांना पदरात घेवून त्यांना आईचं अस्तित्व दिलं एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांच्या उद्धारासाठी आपलं सार आयुष्य खर्ची घातलं. स्मशानाच्या काळोख्यात तुकडे मोडून अनाथांच्या आयुष्यात प्रकाश पसरवून आज या लाखो लेकरांना पोरकं करून माई आपल्याला सोडून गेली यावर विश्वास बसत नाही. माई अजरामर झाल्या त्यांच्या कार्याने, त्यांच्या प्रगल्भ विचाराने , कष्टाने, जिद्दीने आणि परिश्रमाने. माईच्या अचानक निघून जाण्याने समाजामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही, असी भावपूर्ण श्रद्धांजली प्रदीप गुरुखुद्दे यांनी महाराष्ट्र अहीर गवळी संघटनेतर्फे वाहली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaSindhutai Sapkal
loading image
go to top