
Akola Crime
sakal
मलकापूर : दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाचा खून तर एकास गंभीर जखमी केल्याची घटना ता. ८ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, चार जणांना ताब्यात घेतले आहे, तर पाच जण फरार आहेत.