

Lakhan Ambhore Death Sparks Outrage; 16 Booked After Violent Crowd Attack
sakal
अकोट: लखन अंभोरे वय (३५) रा. राजेन्द्र नगर, झिंगाभोई पुरा, अकोट याचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. सोमवार दिनांक ९ मार्च रोजी लखन अंभोरे वर काठ्या, लोखंडी पाईप, दगड विटा वापरून जीवघेणा हल्ला झाला होता. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यावर त्याला तातडीने अकोला येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते पण उपचारादरम्यान लखन अंभोरे चा मृत्यू झाला.