esakal | सौम्य गजर करीत भक्तिभावाने उभारला लाटामंडप | Lata Mandap Utsav
sakal

बोलून बातमी शोधा

Lata Mandap Utsav

सौम्य गजर करीत भक्तिभावाने उभारला लाटामंडप

sakal_logo
By
मुशीर खान कोटकर

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) - विदर्भ मराठवाड्यातील लाखो भाविकांसाठी आराध्य दैवत असलेल्या येथील प्रती तिरुपती श्री बालाजी महाराज यांचा लाटा मंडप उत्सव ३८० वर्षाच्या इतिहासात प्रथमच खंडित झाला होता. यंदा प्रशासनाने दिलेल्या परवानगी नुसार हा उत्सव एक वर्षाच्या खंडानंतर आज (ता. १३) प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करून गोविंदा गोविंदा चा सौम्य गजर करीत मोठ्या भक्तिभावाने लाटा मंडप उभारण्यात आला.

कोरोना संसर्गाच्या तीव्र लाटे च्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव व धार्मिक उत्सवासला परवानगी मिळाली नव्हती. परिणामी, सुमारे ३८० वर्षाची परंपरा लाभलेल्या श्री व्यंकटेश बालाजी महाराजांची ऐतिहासिक व धार्मिक परंपरा खंडित झाली होती. दरम्यान, श्री बालाजी महाराज संस्थान चे वंशपारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या सह संस्थांनचे मानकरी पुजारीगण सेवेकरी व भाविक युवकांनी लेखी निवेदन देऊन कोरोना नियमाचे पालन करून धार्मिक उत्सवांना परवानगी देण्याची विनंती जिल्हा प्रशासनाकडे केली होती.

हेही वाचा: रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपासून वीजनिर्मिती; भड यांचे संशोधन

मागील आठवड्यात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थित श्री बालाजी उत्सव समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तहसीलदार, ठाणेदार यांच्या चर्चा करून धार्मिक उत्सवाला मर्यादित स्वरूपात का होईना परवानगी द्या, अशा भावना व्यक्त केल्या. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या परवानगी व सूचनेनुसार सकाळी अकरानंतर ठराविक सेवेकरी भाविकांच्या सहभागाने लाटा मंडप उत्सवाला सुरुवात झाली. एक एक लाट उभारताना बोल बालाजी महाराज की जय, 'लक्ष्मी रमणा गोविंदा' चा गजर झाला बालाजी फरसा वरील प्राचीन दगडी हनुमान मूर्ती व दगडी गरुडाच्या मूर्तीला अखंड दोर बांधून २१ महाकाय ३५ फुटी सागवानी लाटा ४२ मंडपात गुंफन लाटा मंडप उभारण्यात आले.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण २१ लाटा मोठ्या भक्तिभावाने उभारण्यात आल्या होत्या. मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत लाटा मंडप उत्सव साजरा करावयाचा असल्याने ठाणेदार जयवंत सातव यांनी बालाजी फरसा कडे येणारे सर्व मार्ग बॅरिकेट्स लावून चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या उत्सवा प्रसंगी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापक किशोर बिडकर, तहसीलदार श्याम धनमने, पालिका मुख्याधिकारी अरुण मोकळ, नायब तहसीलदार श्री राणे, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, अर्पित मिनासे, जगदीश कापसे, गोविंद झोरे, तुकाराम खांडेभराड, विजय देवउपाध्ये, गोपाल व्यास, मोरेश्वर मीनासे, दीपक मललावत, सुरज गुप्ता, राजेश उदासी, सुनील शेजुळकर, रवींद्र मोहिते कैलास धनावत आदींसह भाविक भक्तांनी सहभाग घेतला.

loading image
go to top