esakal | रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपासून वीजनिर्मिती; नितीन गडकरी यांच्यासमोर सादरीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

satyanarayan bhad

रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपासून वीजनिर्मिती; भड यांचे संशोधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : सध्या विजेची टंचाई देशभर घाम फोडत आहे. पारंपरिक उर्जानिर्मितीची साधने अपुरी पडत आहेत. अपारंपरिक उर्जेला मर्यादा येत आहेत. मात्र, वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सत्यनारायण भड यांनी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या दाबातून उर्जानिर्मिती शक्य असल्याचा शोध लावला आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर प्रात्यक्षिकही केले आहे.

महामार्गावर दररोज हजारो वाहने धावतात. मात्र, या धावणाऱ्या वाहनांतून विजनिर्मिती होईल, असे कोणालाही वाटणार नाही. मात्र, वाशीम येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्युत तंत्रज्ञ म्हणून निवृत्त झालेले सत्यनारायण भड यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. महामार्गांवर वाहनांचे वजन प्रचंड असते. तर वाहन नसताना ते वजन शून्य असते. वजनाच्या या चढउतारातून निर्माण होणाऱ्या कंपनाने विद्युत निर्मिती शक्य असल्याचा शोध सत्यनारायण भड यांनी लावला आहे.

यासंदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दिल्लीत या शोधाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. गडकरी यांनी सत्यनारायण भड यांच्या या शोधाचे कौतुक करीत केंद्रीय महामार्ग विभागाला दस्तावेज सादर करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा: इतिहास चाळून बघा; गैर काँग्रेसी सरकार असतानाच ओबीसींना आरक्षण

अशी होते वीजनिर्मिती

महामार्गावरून धावणाऱ्या जड वाहनाचे वजन शेकडो टन असते. वाहन धावत असताना त्याच्या वजनाने रस्त्यावर प्रचंड दाब पडतो. मात्र, वाहन निघून गेल्यानंतर हाच दाब एकदम कमी होऊन शून्यावर येतो. महामार्गावर वाहनाची वर्दळ असल्याने प्रचंड दाब पडणे व तो एकदम शून्य होणे, ही प्रक्रिया वारंवार होते. त्यातून निर्माण होणाऱ्या कंपनांतून विशिष्ट उपकरणाच्या सहाय्याने वीजनिर्मिती होते.

loading image
go to top