अकोला - खामगाव येथील रोहन पैठणकर यांच्यावर त्यांच्या जात व धर्म विचारून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे..या प्रकरणात कठोर कारवाई होणे आवश्यक असून, आतापर्यंतच्या सर्व गृहमंत्र्यांपैकी देवेंद्र फडणवीस हे सर्वात लाचार आणि कमकुवत गृहमंत्री ठरले आहेत, अशी तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.ते मंगळवारी सकाळी अकोला येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रोहन पैठणकर यांच्या भेटीप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलत होते..सपकाळ म्हणाले, 'खामगावमध्ये रोहन पैठणकर या युवकाला जात विचारून ‘गाय चोर’ ठरवत अमानुष मारहाण करण्यात आली. त्याला निर्वस्त्र करण्याचाही प्रयत्न झाला. ही घटना केवळ गुन्हा नसून समाजात जातीय तेढ निर्माण करणारा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला असून, त्यामुळे संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.'.मॉब लिंचिंगची संस्कृती बळावते आहे'राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे तीन तेरा वाजले असून, मॉब लिंचिंगसारख्या घटना आता सामान्य होत चालल्या आहेत. महायुती सरकार अशा घटनांना खतपाणी घालत आहे. पोलिस प्रशासन पूर्णतः निष्क्रिय झाले असून, गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला..प्रशासनाची संवेदनशीलता हरवली'अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या घटनेनंतरही अद्याप बुलढाणा जिल्हा प्रशासनाकडून ना कोणी भेटीस आले, ना कुटुंबीयांची विचारपूस केली. हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे,' असा आरोपही सपकाळ यांनी केला..या भेटीप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश तायडे, आमदार साजिद खान पठाण, अकोला शहर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे, अशोक अमानकर, बबनराव चौधरी, महेंद्र गवई, धनंजय देशमुख, रामविजय पुरुंगळे, तेजेंद्र चौहान, डॉ. जिशान हुसैन, कपिल रावदेव, कपिल ढोके आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.