विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीला मतविभाजनाची भीती । akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकाेला : विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीला मतविभाजनाची भीती

अकाेला : विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीला मतविभाजनाची भीती

अकोला : विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी शुक्रवार, ता. १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारांकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार सदस्यांची मनधरणी करण्याचा गुरुवार हा शेवटचा असेल. उमेदवारांकडून त्यासाठी ‘अर्थ’कारणावर भर दिला जात आहे. विजयाचे लक्ष्य गाठताना एकीकडे महाविकास आघाडीला मतविभाजनाची भिती आहे तर दुसरीकडे भाजपकडून जादुई आकडा गाठण्यासाठी जोड-तोडवर भर दिला जात आहे.

विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. बालमित्र व एकेकाळचे व्यावसायिक मित्रच या मतदारसंघात एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहे. विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया हे तीन वेळा या मतदारसंघात विजयी झाले आहे तर विजयाचा चौकार मारण्याची तयारी करीत आहे. मात्र, त्यांच्यापुढे तिन्ही जिल्ह्यातील स्वपक्ष शिवसेनेसह महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य मतदारांमध्ये फुट पडण्याचे आव्हान आहे. ते रोखण्यासाठी आमदार बाजोरिया यांनी ‘अर्थ’कारणासह ‘समाज’कारणाचाही वापर केला आहे. यापूर्वी तीन वेळा विजयी होताना भाजपच्या सदस्यांची साथ मिळत होती.

हेही वाचा: नांदेड : मोकळ्या हवेत फिरण्यासह व्यायामाकडे कल

यावेळी मात्र, त्यांच्याविरुद्धच लढण्याची वेळ आल्याने त्यांना आता अपक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

दुसरीकडे भाजपने अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे राजकारणातील गणितं ‘सरळ’ करून देताना हा एक गठ्ठा मतदार वळविण्याचे प्रयत्न केले असून, त्यात यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अपक्षांच्या मतावर ‘अर्थ’कारणाचा प्रभाव राहणार असल्याने ही मते पारड्यात पाडून घेण्यासाठी भाजपचे वसंत खंडेलवाल व शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे दोन्ही उमेदवार प्रयत्नात आहेत.

तिन्ही जिल्ह्यातील पक्ष स्थिती

  • काँग्रेस : १९१

  • राष्ट्रवादी : ९१

  • शिवसेना : १२४

  • वंचित : ८६

  • भाजप : २४५

  • एमआयएम : ०७

  • अपक्ष/आघाडी : ७८

  • एकूण : ८२२

हेही वाचा: नाशिक : भाजपच्या आयटी पार्कला केंद्र सरकारचा बूस्ट

अंतर्गत राजकारणाचा फटका मुळावर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचे एकला चलो रे आणि शिवसेनेतील अंतर्गत राजकारण महाविकास आघाडी उमेदवारांच्या मुळावर उठले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे शिवसेनेचे दिग्गज नेते महाविकास आघाडीच्या मतांची विभाजन टाळण्यासाठी प्रयत्नात आहेत. त्यात त्यांना किती यश येत हे शुक्रवारी होणाऱ्या मतदानानंतर मंगळवार, ता. १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

उमेदवारांचे ‘समाज’कारण

विधान परिषदेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे उमेदवार वंसत खंडेलवाल या दोन्ही उमेदवारांचा अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. व्यावसायिक संपर्कासह सामाजिक संपर्काच्या माध्यमातून दोन्ही उमेदवार ‘समाज’कारणातून मतांची गणित मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी सामाजिक दबावाचाही वापर केला जात असल्याची माहिती आहे.

Web Title: Legislative Council Election Mahavikas Aghadi Fears Division

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top