Akola : विधिमंडळात गाजला शिवणी विमानतळाचा मुद्दा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Shivni Airport Expansion work

Akola : विधिमंडळात गाजला शिवणी विमानतळाचा मुद्दा

अकोला : शिवनी विमानतळचा विस्तारीकरणाचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, भूसंपादन कामासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रहाची मागणी अकोला पूर्वचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवारी (ता. २३) उपस्थित केली.

शिवणी येथील विमानतळ १९४२ पासून निर्मित आहे. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जागा उपलब्ध करून दिली आहे. चौदाशे मीटरची धावपट्टी १८०० मीटर झाल्यास मोठी विमाने या ठिकाणी उतरू शकतील. त्यासोबतच केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेमध्ये शिवणी विमानतळाचा समावेश होऊन बुलढाणा, वाशीम, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ जिल्ह्याला उपयोगी पडणारे हे विमानतळ उद्योग तसेच पर्यटनाला चालना देणारे ठरू शकते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाचा मुद्दा सोडवण्यासाठी कार्यवाही केली होती, परंतु अडीच-तीन वर्षात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सरकारने एकही दमडी न दिल्यामुळे भूसंपादनाचे काम थांबले आहे. सदर कामाला गती देत शिवणी विमानतळासाठी सरकारने ताबडतोब निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली. या विषयावर मंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक उत्तर देत यासंदर्भात ठोस तरतुदी मधून निधी उपलब्ध करून देऊन सदर विमानतळाचा समावेश उड्डाण योजनेमध्ये करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील राहील असे सांगितले.

Web Title: Legislature Akola Shivni Airport Expansion Work Mla Randhir Savarkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..