esakal | खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, कार - कंटेनर अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, कार - कंटेनर अपघात

खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, कार - कंटेनर अपघात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अनिल दंदी

बाळापूर : खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात असलेली कार समोरील भरधाव कंटेनर खाली आल्याने एक जण ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील पारस फाट्यावर आज रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. (Life lost in an attempt to save the pits, car - container accident)

अमोल हरीदास कोगदे रा. गाडेगाव (तेल्हारा) असे मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग व बाळापूर पोलिस घटनास्थळी दाखल होत कायदेशीर सोपस्कार पार पाडले.

हेही वाचा: अकोटात प्रसुती दरम्यान मातेसह नवजात बालकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच ३१ बीबी ३१११ या क्रमांकाची कार खामगाव कडून अकोल्याच्या दिशेने येत होती, तर एन एल ०१ एए ०३०२ हा कंटेनर खामगावकडे जात होता. कार मध्ये अमोल हा एकटाच होता. राष्ट्रीय महामार्गावरील शिवनेरी हॉटेल जवळ खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमोलचा वाहनावरील ताबा सुटला व तो समोरील भरधाव कंटेनरच्या खाली आला. त्यामुळे अपघात होऊन अमोल हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस व महामार्ग पोलीस मदत केन्द्राचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने अमोलला उपचारासाठी सर्वोपचारमध्ये रवाना केले. मात्र वाटेतच अमोलची प्राणज्योत मालवली.

संपादन - विवेक मेतकर

Life lost in an attempt to save the pits, car - container accident

loading image