esakal | अकोटात प्रसुती दरम्यान मातेसह नवजात बालकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

अकोटात प्रसुती दरम्यान मातेसह नवजात बालकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोट ः अकोट शहरातील अमृतेश हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान महिलेसह नवजात बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला होता. आशिष जानराव उतखेडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, डॉ.हरीश जोत यांनी सुद्धा गोधळ घातल्या प्रकरणी तक्रार दिली असून, पोलिसांनी ती चौकशीत घेतली आहे. (Death of a newborn child with mother during childbirth in Akot)

हेही वाचा: स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याचे कॉँग्रेसचे संकेत


याबाबत सविस्तर वृत्त असे की अकोट शहरातील डॉ. हरीश जोत यांच्या अमृतेश हॉस्पिटलमध्ये आशिष उतखेडे यांच्या पत्नी अर्चना आशिष उतखेडे (२६) रा. तानोडा, तालुका अचलपूर.जिल्हा अमरावती यांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. ता.११ जून रोजी दुपारी १.३० वाजता पूर्वी प्रसूतीदरम्यान त्यांच्यासह नवजात बालकाचा (स्त्री जातीचे) मृत्यू झाला.

हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कापशी सरपंचांशी संवाद


ही माहिती बाहेत येताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. यावेळी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. तत्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करीत प्रकरण शांत केले. मृतक महिलेचे पती आशिष जानराव उतखेडे यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यू दरम्यान बालकाचे वय एक तासाचे होते. मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट असून, घटनेचा पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ठोंबरे करीत आहे.

संपादन - विवेक मेतकर

Death of a newborn child with mother during childbirth in Akot

loading image
go to top