

Lumpy and Other Diseases Hit Cattle as Veterinary System Struggles
Sakal
-अनुप ताले
अकोला: पशुंच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या पशुसंवर्धन विभागातच सध्या मनुष्यबळाचा प्रचंड अभाव असून, पशुसंवर्धन विभागाच्या पुर्नरचनेनुसार पशुधन विकास अधिकारी तथा पशुधन पर्यवेक्षक संवर्गाची हजारो पदे सद्धा रिक्त आहेत. त्यातच लम्पी सारख्या आजाराने राज्यात थैमान घातले असून, उपचाराअभावी पशुपालन तथा दुग्धव्यवसाय धोक्यात आला आहे.