
पातूरात ४५ गोवंश जप्त
अकोला - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पातूर येथे कारवाई करीत अवैधरित्या कत्तलीसाठ घेवून जात असलेले ४५ गोवंश जप्त केले. या कारवाईत पाच लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका आरोपीला अटक केली आहे.
पातूर येथील सैदू प्लॉट परिसरातील नवीन निर्माणाधिन अकोला-वाशीम राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासवरील मोकळ्या जागेत गोवंश निर्दयतेने वागणूक देवून बांधून ठेवले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ता. १२ ऑगस्ट रोजी मिळाली होती. पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता सैय्यद आसिफ उर्फ हाफिज (३२, रा. शाहबाबू दर्ग्याजवळ, गुलतुरा प्लॉट, मुजावरपुरा, पातूर) याने कत्तलीसाठी गौवंश विक्री करण्याकरिता बांधून ठेवले असल्याचे आढळून आले. त्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी केली व त्याला विचारपूस केली असता तो समाधानकारक उत्तर देवू शकला नाही.
त्याला गोवंश मालकी व शेतीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. तो या संदर्भात कोणतेही कागदपत्र सादर करू शकला नाही. त्याने अमानुषपणे व क्रुरतेची वागणूक देऊन दाटीवाटीईने जनावरे कोणत्याही चारापाण्याची व्यवस्था न करता निदर्यतेने दोराने बांधून ठेवल्याचे दिसून आले. एकूण ४५ गोवंश आढळून आले. त्यात गाय, गोऱ्हे, वासरू आदींचा समावेश होता. त्याची एकूण किंमत पाच लाख ९२ हजार रुपये आहे. आरोपीचे साथिदार शेर खान आबेद खान, शहजाद खान अहमद खान (दोघेही रा. दुल्हे प्लॉट, मुजावरपुरा, पातूर) आणि सैय्यद अहमद सैय्यद अयुब उर्फ मुन्ना रा. मुजावरपुरा यांचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास पातूर पोलिस करीत आहेत.
कारवाईत यांचा होता सहभाग
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, सागर हटवार, एएसआय नितीन ठाकरे, दत्तात्रय ढोरे, विशाळ मोरे, भास्कर धोत्रे, शेख माजीद, श्रीकांत पातोंड, रवी पालीवाल, संदीप ताले, संतोष दाभाडे, अक्षय बोबडे, नसिफ शेख यांनी पातूर येथे ही कारवाई केली.
म्हैसपूर प्रकल्पाकडे सोपविले गोवंश
स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेले ४५ गोवंश आदर्श गोसेवा अनुसंधान प्रकल्प म्हैसपूर येथे दाखल करण्यात आले आहे.