esakal | जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाउन, सकाळी सात वाजेपर्यंत कडकडीत बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown in the akola district from tomorrow, strictly closed until seven o'clock in the morning

जिल्ह्यात कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शुक्रवारी (ता.17) संध्याकाळी सात वाजेपासून मंगळवारपर्यंत (ता.21) सकाळी सात वाजेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बुधवारी (ता.15) दिले आहे

जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाउन, सकाळी सात वाजेपर्यंत कडकडीत बंद

sakal_logo
By
सुगत खाडे


अकोला  ः जिल्ह्यात कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शुक्रवारी (ता.17) संध्याकाळी सात वाजेपासून मंगळवारपर्यंत (ता.21) सकाळी सात वाजेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बुधवारी (ता.15) दिले आहे.


अकोला जिल्हयात कोविड- विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, कोविड- चा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे असल्यामुळे व विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपायोजना करण्याची आवश्‍यकता निर्माण झाल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोज नियंत्रण अधिनियमांतर्गत शुक्रवारी सायंकाळपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत अकोला जिल्ह्यामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मुक्‍त संचार करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या बाबी राहतील सुरू

  •  दूध विक्री व दुधाचे घरपोच वितरण सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत.
  • सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील.
  • सर्व औषधांची दुकाने तसेच ऑनलाईन औषध वितरण सेवा संपूर्ण कालावधी करता सुरू राहतील.
  • पेट्रोल विक्री केवळ शासकीय वाहने व अत्यावश्‍यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा साखळीतल वाहनास इंधन पुरवठा करतील.
  • प्रत्येक तालुक्‍यामध्ये एक पेट्रोल पंप सुरू राहील.
  • वर्तमानपत्राचे वितरण सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये अनुज्ञेय राहील.
  • वरील बाबी वगळून इतर सर्व सेवा, आस्थापना, प्रतिष्ठाने, दुकाने,
  • राष्ट्रीयकृत व खासगी बॅंक तसेच वित्तीय संस्था, उद्योग व इतर सर्व व्यवसायपूर्णतः बंद राहतील.

याबाबत अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडनिस, अपर पोलिस अधिक्षक निकम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांची उपस्थिती होती.

(संपादन - विवेक मेतकर)