esakal | वाह! चेहरे उजाडणाऱ्या हातांनी लॉकडाउनच्या काळात केली कमाल; कागदातून साक्षात साकारले विठ्ठल-रुखमाई
sakal

बोलून बातमी शोधा

vitthal rukhmai on paper11.jpg

कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावणे संपूर्ण देश ग्रासलेला आहे. संपूर्ण देशात लॉकडाउन असल्याने चार महिने सर्व व्यवहार ठप्प होते. आता हळूहळू सर्व सुरळीत होत आहे.

वाह! चेहरे उजाडणाऱ्या हातांनी लॉकडाउनच्या काळात केली कमाल; कागदातून साक्षात साकारले विठ्ठल-रुखमाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : विठुमाऊली तू माऊली जगाची, माउलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा, काय तुझी माया सांगु शिरीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलीया अभंगा, अभंगाला जोड टाळपिपळ्यांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठल मायबापा, या अंभागाच्या ओळी आठवल्याकी साक्षात विठ्ठल माऊलीची मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते. या विठू माऊलीच्या निर्गुण आकाराला लॉकडाउनच्या काळात वृत्तपत्र आणि रद्दी पेपरमधून साक्षात मूर्ती रुपाने घडवले ते डाबकी रोड येथील ब्युटी पार्लर संचालिका ज्योती विलास विंचनकर यांनी.

कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावणे संपूर्ण देश ग्रासलेला आहे. संपूर्ण देशात लॉकडाउन असल्याने चार महिने सर्व व्यवहार ठप्प होते. आता हळूहळू सर्व सुरळीत होत आहे. सर्व प्रतिष्ठाने उघडत असताना ब्युटी पार्लरमध्ये ग्राहकांशी जवळून संपर्क येतो म्हणून सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने ब्युटी पार्लर उघडण्यास परवानगी सरकारने दिली नव्हती. त्यामुळे घरात बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. या काळात सतत मनात एकच विचार. दरवर्षी उन्हाळ्यात लग्नसराई ऑर्डरमध्ये व्यस्त असतो. 

हेही वाचा - अकोल्यात रुग्ण वाढीचा वेग आवरेना; आणखी कोरोनाचा भडका...

यावर्षी हाताला काही कामच नाही. देवाशिवाय गऱ्हाणी कोणाला सांगणार. सर्व मंदिरे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे बंद होती. दरवर्षी आषाढी एकादशी करता श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. तेव्हा आवर्जुन नमस्कार करून आपल्या अडचणी सोडवण्याची विनवणी पांडुरंगाला करत असतो. देऊळ बंद, पायदळ वारी सुध्दा बंद. काय करावे, काही समजत नव्हते. तेव्हा घरातील न्यूज पेपर व मुलांच्या वह्यांची आवरसावर करताना सतत पांडुरंगाच्या नामसमरणाचा धावा सुरू होता. 

त्यातूनच नकळतच न्यूज पेपर व रफ वह्यांचे पानांना हाताने आकार द्यायला सुरुवात केली. बघता बघता विठ्ठल रुखणमाईची मूर्ती साक्षात रूपाने घडली. ज्योती विंचनकर यांनी सुबक मूर्ती घडवितानाचा त्यांचा हा अनुभव खास ‘सकाळ’च्या वाचकांसाठी शेअर केला आहे. त्या मूर्तीकार नाहीत. माझ्या हाताने विठ्ठल रुखमिनीची मूर्ती कशी घडली हे मलाही कळले नसल्याचे त्या सांगतात. 

मनात सतत विठ्ठलाचा ध्यास असल्याने विठू माऊलीची मूर्ती मूर्तीकार नसतानाही माझ्या हातातून घडली ही माऊलीची कृपाच व माझे भाग्यच असल्याचे त्या म्हणाल्यात. त्यांच्या नावावर ६० मिनिटात १०१ आयब्रो थ्रेडिंग करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविल्या गेला आहे. चेहरे उजाडणाऱ्या या हातातून साक्षात विठू माऊलीची मूर्ती घडली. त्यानिमित्ताने त्यांनी सुख, समृध्दी, आरोग्य संपदा लाभू दे आणि देशावर आलेले कोरोना विषाणूचे संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली आहे.