अरे देवा! आता नाही चालणार मास्कचा जादू...हा आहे धोका

women mask akola.jpg
women mask akola.jpg

अकोला : नोव्हेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाचे संकट आपल्यावर आणखी काही काळ राहणार आहे. या काळात मास्क अर्थात मुखपट्टीचा वापर प्रत्येक व्यक्तीला करावा लागेल. त्यामुळे विविध प्रकारच्या कपड्यांपासून बनवलेल्या मुखपट्ट्या आपल्याला आता बाजारात पाहायला मिळतात. सध्याचा काळ हा उन्हाळ्याचा असल्यामुळे त्यापासून साधारण मुखपट्ट्यांपासून सुद्धा आपला विषाणूमुळे बचाव होत आहे. परंतु यानंतरच्या काळात पावसाळा सुरु होत असल्याने साधारण कपड्यापासून बनलेल्या मास्कचा ‘जादू’ चालणार नाही. 

प्रदुषित देशांमध्ये भारताचा समावेश आहे. त्यामुळे प्रदुषणापासून बचाव करण्यासाठीच आपल्या येथे लोक साधारणपणे मास्कचा वापर करतात. याचं प्रमाण सुद्धा आपल्याकडे कमीच आहे. पण आता कोरोना महामारीमुळे परिस्थितीत बदल झाला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी मास्क वापर करत आहे. महाराष्ट्रात तर घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तोंडाला माक्स लावण्याची बंदीच करण्यात आली आहे. साधारण कपड्यापासून बनलेले हे मास्क नागरिकांचा कोरोनापासून काही प्रमाणात बचाव सुद्धा करत आहेत. परंतु आता उन्हाळ्याचे दिवस संपत असून पावसाच्या दिवसाला सुरुवात होत आहे. त्यातच केंद्र शासनाने टाळेबंदी शिथिल करुन टप्प्या-टप्प्याने जनजीवन सुरळीत करण्याचा आराखडा सुद्धा जाहीर केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडलीत. यावेळी ते स्वस्त कापडी मास्क वापरतील. परंतु पावसाच्या दिवसात कापडी मास्क पाण्यात भिजण्याची दाट शक्यता असल्याने त्यापासून कोरोनाचा किती प्रमाणात बचाव होईल, हे सांगता येत नाही. परिणामी येणाऱ्या काळात साधारण कापडी मास्कची जादू चालणार नसल्याचे दिसून येत आहे. 

जाणून घ्या मास्कची ‘एबीसीडी’
साधारणपणे 1897 च्या सुमारास पॅरिसमध्ये फेस मास्कच्या वापराल सुरुवात झाल्याची नोंद आहे. त्यानंतर सार्सच्या महामारीला रोखण्यासाठी 2002 मध्ये मास्कचा वापर करण्यात आला. त्यापूर्वीपासून डॉक्टर सर्जरी करताना मास्कचा वापर करतात. परंतु भारतात मात्र प्रदुषणापासून बचावासाठी नागरिक काही प्रमाणात मास्कचा वापरत करतात. परंतु आता कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मास्क वापरणे सक्तीचे झाले आहे. 

यामुळे आवश्‍यक आहे मास्क
एका अभ्यासानुसार, एक व्यक्ती दिवसातून किमान 16 वेळा चेहऱ्याला स्पर्श करतो. ज्यामुळे अनेक विषाणू, बॅक्टेरिया तोंडावाटे मानसाच्या शरीरात प्रवेश करतात. अशात मास्कचा वापर केला तर थेट चेहऱ्याला हात लागत नाहीत. म्हणजेच तोंड झाकल्यामुळे संक्रमणही होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com