

Akola Fake Soybean Seed Row: State Government Steps In with High-Level Review
esakal
-योगेश फरपट
अकोला : अकोला जिल्ह्यात निकृष्ट व बोगस सोयाबीन बियाण्यांच्या वितरणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 15 जुलै रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असून या बैठकीसाठी आमदार सावरकर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.