

Municipal elections may get delayed as the voter list schedule is revised again
Sakal
श्रीकांत राऊत
अकोला : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रमात पुन्हा बदल झाला आहे. निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक मंगळवारी (ता.९) जाहीर केले आहे. दुरुस्त केलेल्या अंतिम मतदार याद्या आता दि.१५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती व आक्षेप दाखल केले जात आहेत.