Mahavitaran Strike Update : संपकाळात वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavitaran Strike Update

Mahavitaran Strike Update : संपकाळात वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील

अकोला : समांतर वीज वितरण परवान्याला विरोध दर्शवित महावितरणच्या कर्मचारी,अभियंता,अधिकारी कृती समितीव्दारे राज्यव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपात अकोला परिमंडळातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे.

त्यामुळे आज दिनांक ३ जानेवारी मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या ७२ तासाच्या संप काळात सुरळीत वीज पुरवठ्याची खबरदारी घेतली असली तरी,या काळात ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या संपात महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील एकूण २९ संघटनांचे कर्मचारी,अभियंते व अधिकारी सहभागी आहेत.

अकोला,बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व माहीती देण्यासाठी विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने महावितरणकडून सर्व काळजी घेण्यात येत आहे,तथापि या कालावधीत वीज पुरवठा खंडित झाल्यास पुर्ववत होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी संयंम पाळून सहकार्य करावे.

संप काळात कर्मचारी,अभियंते व अधिकारी सहभागी झाल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये, त्यांना तक्रार दाखल करता यावीत,तसेच वीज वाहिनी तुटने,शॉर्ट सर्किट होणे आदीबाबत माहीती देण्यासाठी २४ × ७ सह नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे अकोला जिल्ह्यातील ग्राहकांनी सह नियंत्रण कक्षाच्या ७८७५७६३३३९ या नंबरवर,बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५७६३४८५ आणि वाशिम जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५७६३२७६ या नंबरवर माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

रुग्णालये तसेच अत्यावश्यक सेवेतील विभागांनी पर्यायी व्यवस्था ठेवावी

संपकाळात वीज पुरवठ्याशी संबंधीत सर्व खबरदारी घेतल्या गेली असली, तरी वीज पुरवठा खंडित झाल्यास तो पुर्ववत होण्यास थोडा कालावधी लागेल या दृष्टिने रूग्णालये किंवा अत्यावश्यक सेवेतील विभागांनी पर्यायी व्यवस्था (उदा.डिझेल जनरेटर,इनव्हर्टर इत्यादी) उपलब्ध ठेवावी असे आवाहन महावितरणने केले आहे.