prataprao jadhav
sakal
अकोला - राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती अखंड एकजुटीनेच उतरणार असल्याचे स्पष्ट करत केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय प्रतापराव जाधव यांनी महत्त्वाचे विधान केले. बदलत्या राजकीय घडामोडी, बिहार निवडणूक निकाल आणि जनतेची बदलती मानसिकता पाहता काँग्रेसबाबतचा नाराज भाव अधिक प्रकर्षाने दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.