
अकोला : अजितदादांवर टीका करताना जरा जपून वागण्याचा सल्ला देत मिटकरी म्हणाले, विखे पाटील विसरले असावेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. अजितदादांवर टीका करताना भाजपश्रेष्ठींनी याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे. तसेच विखे पाटील यांच्या मंत्रालयातील कार्यपद्धतीवरही मिटकरींनी निशाणा साधला. बाकी विखे पाटीलजी, आपल्या कार्यकर्तृत्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगली आहे. त्यामुळे उगाच खेटे घेऊ नका, राधेकृष्ण! असा सांकेतिक टोलाही त्यांनी लगावला.