Financial Fraud : “विश्वासावरच वार!” गद्रे ऑटोकॉनमध्ये ५.६४ लाखांचा घोटाळा; मॅनेजरसह सहा जण अटकेत

Mahindra dealership fraud Akola : अकोल्यातील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा डिलरशिप गद्रे ऑटोकॉनमध्ये कर्मचाऱ्यांनी संगनमताने ५.६४ लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. वाशिम शाखेतील मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली असून आर्थिक फसवणुकीचा तपास सुरू आहे.
Mahindra dealership fraud Akola

Mahindra dealership fraud Akola

sakal

Updated on

योगेश फरपट

अकोला : नामांकित महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा ऑटोमोबाईल डिलरशिप गद्रे ऑटोकॉन प्रा. लि. मध्येच आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा भंडाफोड झाला असून, कंपनीच्या विश्वासाला तडा देत कर्मचाऱ्यांनीच लाखोंची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाशिम शाखेतील मॅनेजरसह सहा कर्मचाऱ्यांनी संगनमताने तब्बल ५ लाख ६४ हजार ८९९ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com